धारवाड-पणजी रोडवरील नागरगाळीजवळील वनविभागाच्या विश्रामगृहाजवळ 407 टेम्पो झाडाला आदळून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला तर टेम्पोत बसलेले दोन युवक गंभीर जखमी झाले.

सोमवारी सकाळी 8 वाजता बंगळुरूहून गोव्याच्या दिशेने वैद्यकीय साहित्याने भरलेला टेम्पो क्रमांक केए 53 एए 0775 रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळला, त्यामुळे चालक सय्यद निजाम (वय 19, रा. बेंगळूर) हा जागीच ठार झाला. त्याच्यासोबत टेम्पोमध्ये असलेले
19 वर्षीय मजार शेख व तोहिर शेख, दोघेही बेंगळूर येथील रहिवासी हे गंभीर जखमी झाले. टेम्पो चालक निजाम सय्यद याचा मृतदेह वाहनात अडकला होता. घटनास्थळी क्रेन मागवून तो बाहेर काढण्यात आला. ही दुर्घटना लोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली


Recent Comments