निप्पाणी तालुक्यातील कुसनाळ गावातील कमला भगत यांचे घर गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे कोसळले, त्यात घरातील म्हैस मरुन एक वर्ष होऊन गेले . सरकारकडून मदत न मिळाल्याने त्या अजून भाड्याच्या घरात राहत आहे. हे संतापाचे कारण आहे.

गेल्या एक वर्षापासून कमला सरकारी घर मिळवण्याच्या प्रयत्नांत दिवस वाया घालवत आहे, घर मंजूर होण्यास उशीर होत असल्याने भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे .
अतिवृष्टीमुळे ज्यांची घरे कोसळली त्यांना सरकारने ५० हजार ते ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली होती. पण कमला याना याचा लाभ मिळाला नाही. ही बाब गावातील लेखापाल, ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून देऊनही काहीही उपयोग झाला नसल्याची व्यथा पीडित महिलेने व्यक्त केली.
राहण्यासाठी स्वतःचे घर नसल्याने कमलाची स्थिती दयनीय बनली आहे. या भागातील लोकप्रतिनिधींनी या समस्येचा गांभीर्याने विचार करून कमला याना घर मंजूर करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत हुक्केरी यांनी केली आहे. ( )
जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने विविध योजना राबविल्या आहेत. कुसनाळ गावातील या गरीब विधवेला लोकप्रतिनिधी घर देणार का, याची वाट पाहावी लागेल.


Recent Comments