दसरा सणानिमित्त उगार स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे वन सेट टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट – २०२३ चे आयोजन करण्यात आले होते आणि त्याचे उद्घाटन दुग्ध व्यावसायिक विलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.


उगार स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने शनिवारी उगार शुगर कारखाना विहार स्टेडियमवर वन सेट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उगार साखर कारखाना तसेच दुग्ध व्यवसायिक विलास पाटील यांच्या सहकार्याने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून प्रथम पारितोषिक ५० हजार रुपये, द्वितीय पारितोषिक ३० हजार रुपये, तृतीय व चौथे पारितोषिक प्रत्येकी १० हजार व एक आकर्षक ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातून सुमारे ५० संघ सहभागी झाले होते , अशी माहिती उगार स्पोर्ट्स असोसिएशनचे उपाध्यक्ष विक्रम भोसले यांनी दिली.दुग्ध व्यावसायिक विलास पाटील, आबिद इनामदार, नगरसेवक प्रफुल्ल थोरुशे, योगेश कुंभार, शिवानंद करची, वल्लभ कागे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी उदय पाटील, सागर कांबळे, राजेंद्र बेळंकी, भरत मगदुम, समद अत्तार, राजेंद्र कोरबू, दिनेश बेलगळी, भरत शेट्टी, रघु गस्ती, चेतन कदम, हुसेन शेख आदींनी सहकार्य केले


Recent Comments