जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा बुधवार दिनांक 11 रोजी सकाळी 10 वाजता श्री सिद्धेश्वर समुदाय भवन, ऐनापूर येथे होणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने बेळगाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे पाच हजार भाविक सहभागी होणार आहेत.

पादुका दर्शन कार्यक्रमानिमित्त जिल्हा प्रसारण माध्यम समन्वयक शंकर परीट म्हणाले की, हा अभूतपूर्व कार्यक्रम असून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येणार आहेत. सकाळी श्रींच्या पादुकांचे आगमन होणार असून त्यानंतर सामाजिक कार्यक्रम, गुरुपूजन, आरती कार्यक्रम, प्रवचन, उपासकांची दीक्षा, पादुका दर्शन, पुष्पवृष्टी असे कार्यक्रम होतील.
तसेच कार्यक्रमाचे पर्यवेक्षक संजीव वागकर यांनी सविस्तर माहिती दिली.ऐनापुर सिद्धेश्वर मंदिराच्या सभागृहात त्यांनी प्रक्षेपण करणाऱ्या वाहनांचे पूजन करून कार्यक्रमात सहभाग घेतला.
यावेळी अनिल भोसले , नानासाहेब जाधव, संजय चौहान, श्रीमंत चाबरे, शिवाजी वागमोडे, राजू खुळे, दादासाहेब चौहान, परशुराम रसाळ , आमगौडा वोडेयर यांच्यासह अनेक हितचिंतक उपस्थित होते.


Recent Comments