Chikkodi

अंकली ग्रामपंचायतीला “गांधी ग्राम” पुरस्कार.

Share

कृष्णा नदीच्या काठावरील चिक्कोडी तालुक्यातील अंकली गावाला , गावाचा सर्वांगीण विकास आणि पारदर्शक कारभारासाठी महात्मा गांधींच्या नावाने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित गांधी ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे .

स्थानिक प्रशासनातील चांगली कामगिरी आणि विकासकामांच्या आधारे राज्य शासनाने अंकली ग्रामपंचायतीची गांधी ग्राम पुरस्कारासाठी निवड केल्याने सीमाभागातील व अंकलीच्या ग्रामस्थांना आनंद झाला आहे. केएलईचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांचे अंकली हे मूळ गाव. हे गाव शहरापेक्षाही विकसित झालेले सुंदर गाव आहे.

लाखो लोकांचे आराध्य दैवत असलेल्या महाराष्ट्रातील पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी यात्रेला अंकली सरकार कुटुंबाचा अश्व निघतो हे गावासाठी ऐतिहासिक आणि विशेष आहे. आता हा पुरस्कार मिळाल्याने गावाचा अभिमान आणखी वाढला आहे.

बंगळुरूमध्ये , २ ऑक्टोबर रोजी विधान सौधच्या बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात ग्रामविकास व पंचायत राज मंत्री प्रियांक खर्गे यांच्या हस्ते अंकली ग्रामपंचायतीला गांधी ग्राम पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष बाळाप्पा उमराणी, उपाध्यक्षा लता बुबनाळे, पंचायत विकास अधिकारी विनोद असोदे यांनी हा पुरस्कार स्वीकारला .यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: