पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यप्राणी, वनस्पतींचे रक्षण करणे आवश्यक आहे असे विचार खानापूरचे आ. विठ्ठल हलगेकर यांनी व्यक्त केले.


गांधीजयंती दिनी खानापूर येथे 69 व्या राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह 2023 च्या मिशन भागीदारी कार्यक्रमाचे उद्घाटन आ. विठ्ठल हलगेकर यांनी केले. यावेळी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर बोलताना आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले की, वन्यप्राणी व वनस्पती नष्ट होऊ नयेत यासाठी शासनाने कडक कायदा केला आहे. त्याचे सर्वानी पालन केले पाहिजे.
यावेळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी आदी उपस्थित होते.


Recent Comments