चिक्कोडी : पीएसआय बसनगौडा यांच्या हस्ते नुकतेच चिक्कोडी शहरातील एसबीआय कॉलनीत बसवण्यात आलेल्या आलेल्या पथदीपांचे उद्घाटन करण्यात आले.

एसबीआय वसाहतीतील लोकांची अनेक दिवसांपासूनची मागणी असलेल्या पथदिव्यांचे काम पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगरपरिषद सदस्य साबिर जमादार म्हणाले कि , निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आम्ही टप्प्याटप्प्याने करत आहोत.या रस्त्यावरून अंधारात चालणे लोकांना त्रासदायक होते. आम्ही ही समस्या गांभीर्याने घेऊन पथदीप बसवले आहेत .
यावेळी ऍड . बी.डी.पाटील, वसंत देवरुषी, विनय दोड्डमणी, अशोक धबाले, संतोष केदारी, बालगौडा पाटील, पांडुरंग आप्पाजीगोळ , मारुती बडिगेर, इरफान काळेगर, अल्लगनावर सर, कोठीवाले सर,
सद्दाम मुजावर, महेश परीट, सलमाँन मुल्ला, राजू खोत यांच्यासह एसबीआय कॉलनी व इंदिरानगर येथील नागरिक उपस्थित होते.


Recent Comments