कर्नाटक बंदच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरात आज जनजीवन पूर्वपत सुरु आहे .

कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला सोडल्याच्या निषेधार्थ आज पुकारण्यात आलेल्या कर्नाटक बंदच्या पार्श्वभूमीवर चिक्कोडीत बंदला कोणताही पाठिंबा देण्यात आलेला नाही.व्यवसाय, व्यवहार, बस वाहतूक, शाळा, महाविद्यालये, दुकाने नेहमीप्रमाणे सुरू आहेत.
कर्नाटक बंदला पाठिंबा देत प्रवीण शेट्टी यांनी करवे कार्यकर्त्यांकडून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून चिक्कोडी शहरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


Recent Comments