मंगळवारी सायंकाळी मुसळधार पावसामुळे एलिमुन्नोल्ली येथील खासगी शाळेचे वाहन ओढ्याच्या पाण्यात अडकून पडल्याची घटना हुक्केरी शहरात घडली.

हुक्केरी तालुक्यातील एलिमुन्नोल्ली गावातील स्कूल बस मुलांना शाळेतून घेऊन येत असताना , पावसामुळे ओढा ओसंडून वाहत होता आणि चालकाच्या बेपर्वाईमुळे वाहन पाण्यात कलंडून तिरके झाले. स्थानिकांनी बस अडवून विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले .


Recent Comments