सीमावर्ती साखर कारखान्यांनी आधी उसाचा प्रति टन भाव ठरवावा, त्यानंतर शेतकऱ्यांच्या ऊसाची तोडणी करावी, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या व शेतकरी संघटनेच्या सभासदांनी व्यक्त केला. निप्पाणी तालुक्यातील गळतगा गावात ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर थांबवून आपला संताप व्यक्त केला .

भोज गावातील ऊस महाराष्ट्रातील कागल तालुक्यातील केनवडे गावातील अन्नपूर्णा साखर कारखान्याकडे नेत असताना गळतगा गावाजवळ उसाची लॉरी अडवून संताप व्यक्त करण्यात आला.
कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष रमेश पाटील म्हणाले की, साखर कारखान्यांनी उसाचा भाव जाहीर करावा. त्यानंतर शेतकऱ्यांच्या ऊसाची तोडणी झाली पाहिजे. भाव जाहीर न करता ऊस तोडणी सुरू केल्यास कारखान्यांविरोधात लढा देऊ, असा इशारा त्यांनी दिला.
विद्याधर नेजे, विकास समगे, राजू पाटील, भरत नसलापुरे, राजेंद्र हुलीकोप्प, जयगोंडा पाटील, अनिल लगमण्णावर, राजन खोत, राजू पंडित व स्वाभिमानी रयत संघटनेचे सदस्य व कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.


Recent Comments