Belagavi

अधिकाऱ्यांनी शासकीय योजनांचे लाभ नागरिकांना मिळवून द्यावेत : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

प्रत्येक नागरिकाला लाभ मिळावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे दरवर्षी सामाजिक न्याय अंतर्गत अनेक योजना राबवतात. अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडून हे प्रकल्प अपंग व ज्येष्ठ नागरिकांसह सर्वांच्या दारात पोहोचविण्याचे काम करावे, असे आवाहन महिला व बालविकास तथा उडुपी जिल्हा पालकमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
केंद्र सरकारचे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग, उडुपी जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महिला व बाल विकास खाते यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना उपकरणे वाटप समारंभात त्या बोलत होत्या.
मंत्री हेब्बाळकर पुढे म्हणाल्या की, राज्यात 6800 दिव्यांग आहेत. लोकांना विविध दैनंदिन कामे करण्यासाठी वाहनांची आवश्यकता आहे, यावर्षी पहिल्या टप्प्यात 3000 लोकांना वाहनांचे वाटप करण्यात येणार आहे. 30 कोटी रुपये खर्च करून उर्वरित रक्कम पुढील वर्षी दिली जाईल, दिव्यांग शारीरिकदृष्ट्या दुर्बल असले तरी ते मानसिकदृष्ट्या इतरांपेक्षा अधिक बलवान आहेत, त्यांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
जनतेच्या तक्रारी ऐकण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जनता दर्शन कार्यक्रम घेण्यात येत आहे. उडुपी जिल्ह्यात दर महिन्याच्या २५ तारखेला जनता दर्शन कार्यक्रम होईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे, उडुपीचे आमदार यश पाल सुवर्णा, बयंदूरचे आमदार गुरुराज शेट्टी गंटीहोळे, कापूचे आमदार गुरमे सुरेश शेट्टी, जिप सीईओ प्रसन्न एच, उपजिल्हाधिकारी ममता देवी, उपविभागीय अधिकारी रश्मी आदी उपस्थित होते.

Tags: