Belagavi

भुरुनकी ग्रापं हद्दीतील मास्केनहट्टीतील रस्त्याचे अनुदान लाटले?

Share

खानापूर तालुक्यातील भुरुनकी ग्रामपंचायत अंतर्गत येणारी अनेक गावे विकासाविना भकास झाली असून कागदोपत्री विकास दाखवून गैरव्यवहार केल्याचा आरोप ऐकिवात आहे.

भुरुनकी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या मास्केनहट्टी गावातील एससी कॉलनी येथील रमेश चलवादी यांच्या घरापासून शंकर मादार यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रेट रस्त्यासाठी मिळालेले अनुदान लाटून रस्त्याचे काम न करता गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे. याबाबत प्रसारमाध्यमांनी अनेकदा बातम्या देऊनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतलेली नाही हे आश्चर्यकारक आहे.
गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत. पण इथल्या घडामोडींवर नजर टाकली तर, भ्रष्टाचाराच्या बाबतीत पंचायत विकास अधिकारी व पंचायत अध्यक्ष-सदस्यांमध्ये चुरस सुरू असल्याचे दिसून येत आहे. याबाबत माहिती देताना, सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा भेंडीगेरी म्हणाले की, हा रस्ता केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे, मात्र हा रस्ता न बनवता त्यासाठीचे अनुदान लाटण्यात आले आहे. माहितीच्या अधिकाराखाली याची माहिती समोर आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे, असे सांगितले.

Tags: