गणेश चतुर्थीनिमित्त बेळगावातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी त्याचा लाभ घेतला.

बेळगाव शहरात गणेश चतुर्थीनिमित्त दरवर्षी विविध गणेशोत्सव मंडळांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. आज रविवार सुटीचा दिवस असल्याची पर्वणी साधत अनेक उत्सव मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
शहरातील नेहरू नगर, शेट्टी गल्ली, कुलकर्णी गल्ली, कधक गल्ली, शिवाजीनगर आदी ठिकाणच्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी आज गण होमासह, सत्य नारायण, वरदशंकर पूजनासह महागणपती पूजन केले. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी विविध भागातील आबालवृद्ध भाविकांनी गणरायाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.


Recent Comments