बेळगावातील काळी आमराई येथील बेळगाव जिल्हा विश्वकर्मा विद्यावर्धक संघाच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्सवानिमित्त सेवानिवृत्त अधिकारी, यश संपादन करणाऱ्यांचा सत्कार व विविध स्पर्धांमध्ये विजेत्या मुलांना पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री प्रमोद महास्वामी यांनी समारंभात आशीर्वचन देताना सांगितले की, प्रत्येकाने समाजातील लोकांना पुढे आणण्याचा दृढ संकल्प ठेवावा.
कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते डॉ. वीरूपाक्ष बडिगेर यांनी भाषणात समाज टिकवायचा असेल तर संस्कारांची जोड मिळाली पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमात पोलीस विभागातून निवृत्त झालेले सर्कल इन्स्पेक्टर मौनेश देशनूर, आणि पोलीस आयुक्तांचे आप्त सहाय्यक रत्नाकर तठकर यांचा सत्कार करण्यात आला.
विश्वकर्मा समाजातील डॉ. कृष्णप्पा बडिगेर, डॉ. आनंद बडिगेर, जगदीश गणेशगुडी आणि अशोक रुद्रप्पा बडिगेर यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर बडिगेर होते. स्वागत श्रीकांत बडिगेर, प्रास्ताविक रामकृष्ण बडिगेर यांनी केले. डॉ. राघवेंद्र पत्तार यांनी सूत्रसंचालन केले, तर विजय बडिगेर यांनी आभार मानले.


Recent Comments