Hukkeri

जगाला आकार देण्यात विश्वकर्मा यांचे योगदान मोठे आहे – पवन कत्ती

Share

विश्वकर्मा यांचे विश्वातील योगदान मोठे आहे. असे माजी जिल्हा पंचायत सदस्य पवन कत्ती यांनी सांगितले .  ते आज हुक्केरी शहरात विश्वकर्मा समाजातर्फे आयोजित केलेल्या विश्वकर्मा जयंतीच्या मिरवणुकीच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते.

क्यारगुड्ड येथील अभिनव मंजुनाथ महास्वामी यांच्या उपस्थितीत माजी जिल्हा पंचायत सदस्य पवन कत्ती यांनी विश्वकर्मा यांच्या भावचित्राचे पूजन करून हुक्केरी शहरातील आडवी सिद्धेश्वर मठाच्या प्रांगणात शोभायात्रेला सुरुवात केली.

नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले कि , विश्वकर्मा समाज अनेक सुंदर ऐतिहासिक आणि प्रसिद्ध वास्तूंच्या उभारणीपासून ते गरिबांच्या निवासस्थानापर्यंत शिल्पकारांच्या निवाऱ्यापर्यंत जगभर प्रसिद्ध आहेत . त्यांची जयंती आज साजरी केली जात आहे .

मंजुनाथ महाराज म्हणाले की, हुक्केरी शहरात आज विश्वकर्मा जयंती साजरी करून समाजाने खऱ्या गुरूंना आदरांजली वाहिली आहे.
यावेळी विश्वकर्मा समाजाचे नेते गजानन बडिगेर, के.बी.बडिगेर, नारायण बडिगेर, महादेव बडिगेर, अजित बडिगेर, संतोष बडिगेर, गणपती बडिगेर, अशोक बडिगेर, दत्ता बडिगेर आदी उपस्थित होते.

Tags: