चिक्कोडी उपविभागीय अधिकारी माधव गित्ते हे सकाळी सायकलवरून चिक्कोडी उपविभागातील अनेक गावांना भेटी देऊन शेतकरी व लोकांच्या समस्या ऐकून घेतात, त्यांच्या या कार्याचे ग्रामीण जनतेतून कौतुक होत आहे.

एक आयएएस अधिकारी म्हणून, सर्वसामान्यांमध्ये सामान्य माणूस म्हणून सायकल चालवताना, आरोग्याची काळजी घेऊन, लोकांच्या समस्यांना ते जसेच्या तसे, दुसऱ्याच्या सोबत घेऊन जाणे, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. सलग चार-पाच दिवस त्यांचा हा दिनक्रम सुरू होता, काल त्यांनी कब्बूर शहर आणि सदलगा शहराला सायकलवरून भेट देऊन लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या.
आज सकाळी 8 वाजता सायकलवरून चिक्कोडीपासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या मजलट्टी येथे त्यांचे आगमन झाले व विद्यार्थी व शिक्षकांना संबोधित करून शिक्षण व आरोग्याबाबत माहिती दिली व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
यावेळी शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती व शिक्षण प्रेमी रुद्रप्पाण्णा संगप्पगोळ , महाविद्यालयाचे प्राचार्य कोळी सर, उपप्राचार्य तांगडी सर व मंडळाचे वाटगोडे सर उपस्थित होते. सोबतच माधव गित्ते यांचे मजलट्टी येथील ग्रामस्थ व सर्व शाळा, महाविद्यालय व जीपीएस शिक्षण संस्थेतर्फे आभार मानले.


Recent Comments