हुक्केरी तालुका प्रशासन तालुका पंचायत, नगरपालिका व समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तहसीलदार मंजुळा नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
व्हॉइस ओव्हर :व्यासपीठावर नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर बेन्नी, समाजकल्याणचे सहाय्यक संचालक एच.ए.माहुत, प्रादेशिक विभागीय वन अधिकारी प्रसन्न बेल्लद , सामाजिक वनाधिकारी महांतेश सज्जन, बीसीएम अधिकारी महांतेश ओरवलगीन, पशुवैद्यकीय अधिकारी आर.एम.कदम, हिंसाचार समिती सदस्य करप्पा गुडेण्णावर, मंडल अधिकारी रमेश पाटील, हुंजी, ऍड . बी.बी.बागी आदी उपस्थित होते.
त्यानंतर समाजकल्याणचे सहाय्यक संचालक एच.ए.माहुत यांनी या कार्यक्रमात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.
तहसीलदार मंजुळा नाईक यांनी बोलतांना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेले संविधान आंतरराष्ट्रीय लोकशाही जागतिक वाचन दिन म्हणून सर्व लोकांचा एक आवाज या पार्श्वभूमीवर आज जागतिक विक्रम म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण होत आहे.
यावेळी नूतन जिल्हा हिंसाचार समिती सदस्य करप्पा गुडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी वसतिगृहातील विविध विद्यार्थी व अधिकारी उपस्थित होते.



Recent Comments