Kagawad

श्री ज्योतिर्लिंग मंदिराचा कळसारोहण सोहळा

Share

कागवाड व परिसरातील लाखो भाविकांना जोतिबा दर्शनासाठी कोल्हापुरात जावे लागत होते.त्यामुळे अनेकांना येणे-जाणे अशक्य होते.हे लक्षात घेऊन सर्व भाविकांनी कागवाड येथे ज्योतिबाचे मंदिर बांधले व त्याचे आज स्वामीजींच्या उपस्थितीत कळसारोहण पार पडले .

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कागवाड येथील श्री केदारलिंग (ज्योतिबा) मंदिराचा कळसारोहण कार्यक्रम संपन्न झाला.

रविवारी सकाळी 11 वाजता म्हैसाळ हिरेमठ संस्थानचे 108 वे चक्रवर्ती डॉ.शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते कळसाची विधीवत पूजा व मंत्रपठण करून सर्व भाविकांच्या उपस्थितीत कळसारोहण करण्यात आले.

येथे भाविक दररोज पूजा करतात आणि पौर्णिमेला पूजा करण्यासाठी अनेकांना सुमारे 80 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्याची दखल घेऊन येथील भाविकांनी आज मंदिराच्या कळसारोहण कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मंदिराच्या संयोजकांचे आभार मानले.मंदिर समिती सदस्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला शिवाचार्य स्वामीजींनी आशीर्वाद दिले.
दुपारपासून भाविकांना महाप्रसाद वितरित करण्यात येत होता .

Tags: