आपल्या देशात धर्माऐवजी सनातन परंपरा संस्कृतची संकल्पना आहे. मात्र पाश्चिमात्य देशांनी संस्कृतीचेच धर्मात रुपांतर केल्याचे पोलीस निरीक्षक करुणेश गौडा जे. यांनी सांगितले.

सौंदत्ती येथील रामलिंगेश्वर मंदिरात रविवारी बसव भक्तांनी आयोजित केलेल्या शरण संगमाच्या २५ व्या पौर्णिमेनिमित्त आयोजित भव्य आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पीआय करुणेश गौडा म्हणाले की, बुद्ध, महावीर आणि बसवण्णा यांसारखे महापुरुषांनी भारताच्या प्राचीन संस्कृतीत लोकांचे जीवन सोपे बनवण्यात मोठे योगदान दिले आहे. जातीय, आर्थिक आणि सामाजिक समतेच्या आधारे बांधलेल्या अनुभव मंडपममध्ये पहिल्यांदाच लोकशाहीची संकल्पना देण्यात आली.
शरण संगमात पीआय करुणेश गौडा जे., टीएचओ डॉ. श्रीपाद सबनीस, डॉ. सविता सबनीस, प्रवीण पट्टणशेट्टी, कस्तुरी हुली आदींचा सत्कार करण्यात आला.
शिरगुप्पीच्या बसव मंडपाचे बसवराज व्यंकटपुरा शरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष महांतेश गुडस, राष्ट्रीय बसवदल के. शरण प्रसाद, बसवराज कप्पन्नवर, बसवराज लिंगायत, नागप्पा प्रभुनावर, एल.एस. नायक आदी उपस्थित होते.
शासकीय शाळेत आयोजित भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. बेलुब्बी कॉलेजच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले. हाडांचे सांधे, मूळव्याध, अपेंडिक्स, पोटाशी संबंधित आजार, किडनी, रक्तदाब, मधुमेह, हृदयाशी संबंधित आणि डोळ्यांसंबंधीच्या तपासण्यांसाठी स्वतंत्र कक्षांची व्यवस्था करण्यात आली होती. कुशल तज्ज्ञांकडून रुग्ण तपासणी करण्यात आली. शिबिराचा हजाराहून अधिक लोकांनी लाभ घेतला.


Recent Comments