Athani

अपघाती मृत्यू झालेल्या जवानावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार

Share

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लक्ष्मण घोरपडे (वय 24, रा. नदी इंगळगाव) या जवानाच्या पार्थिवावर त्याच्या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील नदी इंगळगाव येथील लक्ष्मण घोरपडे या सुटीवर आलेल्या लष्करी जवानाचा गुरुवारी रात्री उशिरा हारुगेरीजवळ दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाला. मारुती जवानाच्या पार्थिवाची सजवलेल्या वाहनातून , गावातील प्रमुख मार्गावर अंत्ययात्रा काढण्यात आली .

यावेळी भारत माता कि जय , अमर रहे अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या . शाळकरी मुले , लष्करी जवान , पोलीस पथकाकडून , मृत जवानाला , बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली . यावेळी संपूर्ण गाव शोकाकुल झाला होता .


यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, तालुका प्रशासन , ग्राम पंचायत , आणि विविध क्षेत्रातील मान्यवर जवानाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते .

Tags: