Belagavi

पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांची हिंडलगा कारागृहाला भेट

Share

बेळगाव शहर पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी आज हिंडलगा कारागृहाला भेट दिली.
हिंडलगा कारागृहातील बेकायदेशीर कृत्यांबाबत प्रसारमाध्यमांनी वृत्त दिल्यानंतर बेळगाव पोलीस आयुक्तांनी कारागृहाला अचानक भेट दिली. मात्र आपण कोणत्याही तपासणीसाठी येथे आलो नसून, सुरक्षेबाबत झालेल्या बैठकीत भाग घेण्यासाठी आलो आहे असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. फ्लो
गेल्या काही महिन्यांपासून बेळगावातील मध्यवर्ती हिंडलगा कारागृह चर्चेच्या झोतात आले आहे. कारागृहात अनेक बेकायदेशीर कारवाया सुरु असल्याचे आरोप होत आहेत. कैद्यांमध्ये मारामारीच्या घटना आणि कैद्यांना ऐषोआरामी वागणूक देण्यात येत असल्याचेही आरोप करण्यात येत आहेत. काही महिन्यांपूर्वी हिंडलगा कारागृहातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ज्येष्ठ पुजारी उर्फ शाकीर नामक कैद्याने धमकी दिल्याचे प्रकरणही उघड झाले होते. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले होते. या दरम्यानच पोलीस आयुक्तांनी हिंडलगा जेलला हेत दिल्याने चर्चेला ऊत आला आहे. मात्र पोलीस आयुक्त सिद्दरामप्पा यांनी आपण तपासणीसाठी नव्हे तर सुरक्षाविषयक बैठकीसाठी आल्याचे स्पष्ट केले आहे.

Tags: