चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावात लग्नसोहळ्यात आलेले शंभरहून अधिक लोक आजारी पडले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी सार्वजनिक व सेवासदन हॉस्पिटल, यकसांबा आणि सदलगा शहरातील सामुदायिक आरोग्य केंद्रात 100 हून अधिक जणांना दाखल करण्यात आले असून, या घटनेची माहिती चिक्कोडीचे आमदार गणेश हुक्केरी, उपविभागीय अधिकारी माधव गित्ते, सहाय्यक आरोग्य अधिकारी एस.एस.गडाद यांनी जाणून घेतली.
चिक्कोडी सार्वजनिक रूग्णालयात दाखल.झालेल्या आमदार गणेश यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, हे लोक बरे होत आहेत.रक्तदाब कमी झाल्याने 16 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.सध्या त्यांची प्रकृती सुधारत आहे . खबरदारीचा उपाय म्हणून.6 रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. असे ते म्हणले


Recent Comments