कुडलसंगमचे बसव जयमृत्युंजय स्वामीजी म्हणाले की, लिंगायत समाजाला 2अ आरक्षण मिळावे या मागणीसाठी 3 सप्टेंबर रोजी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर निपाणीजवळ सामूहिक लिंग पूजन होणार आहे.

निपाणी तालुक्यातील बेडकिहाळ गावातील सिद्धेश्वर मंदिरात आयोजित लिंगायत समाजाच्या परिषदेत ते बोलत होते.यापूर्वी 2अ आरक्षणासाठी अनेकवेळा संघर्ष झाला. मात्र, सरकारने प्रतिसाद दिलेला नाही. आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केले तरच सरकारला जाग येईल. श्रावण
महिन्याभरात सामूहिक इष्टलिंग पूजा करून , आंदोलनासाठी चला तयार होऊया,” असे ते म्हणाले .
बाइट: बसव जयमृत्युंजय स्वामीजी
कार्यक्रमात ग्रा.पं.चे अध्यक्ष शिवानंद बिजाळे, उपाध्यक्ष पौर्णिमा चिंचणे, भारतीय लष्करात निवड झालेल्या साक्षी गायकुडे, स्वाती मडीवाळ यांचा सत्कार करण्यात आला.
त्यानंतर सिद्धू पाटील, रमेश पाटील यांची भाषणे झाली. किरण पांगिरे, होनगोंडा पाटील, रवी गोणे, राजेंद्र मानबरत्ती संदीप पाटील, राजगोंडा पाटील, बाळासाहेब शिंदे, बसवराज अंबी , प्रकाश अंबी आदी उपस्थित होते.


Recent Comments