खानापूर येथे माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली महादायी सहकारी संस्थेचे उद्घाटन समारंभ पार पडला.

माजी आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली खानापुरात महादयी सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. खानापूर येथील वर्दे पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या संस्थेचा उदघाटन समारंभ उत्साहात पार पडला. बिळकीच्या रुद्रस्वामी मठाचे श्री चन्नबसव देवरु स्वामीजी यांच्या सान्निध्यात हा कार्यक्रम झाला.
सोसायटीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना माजी आमदार डॉ.अंजली निंबाळकर म्हणाल्या की, ही संस्था शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी झटत आहे. सर्वसामान्य जनतेची व मनापासून सेवा करणार आहे. या प्रसंगी व्यवस्थापन मंडळाचे संचालक, अंजली निंबाळकर यांचे समर्थक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments