Chikkodi

हिरेकोडीत लग्नाच्या जेवणातून विषबाधा : १०० हुन अधिक अत्यवस्थ

Share

बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावात लग्नाच्या कार्यक्रमात जेवणातून 100 हून अधिक जणांना विषबाधा होऊन , ते अत्यवस्थ झाल्याची घटना घडली आहे .

जेवणात काहीतरी गडबड असल्याचं बोललं जातंय.लग्न समारंभात जेवलेल्या शंभरहून अधिक जणांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.हिरेकोडी गावात सोमवारी रात्री झालेल्या विवाह सोहळ्यात जेवलेल्या पन्नासहून अधिक जणांची त्यांना उलट्या होत असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

हिरेकोडी येथील पटेल कुटुंबाचा हा विवाह सोहळा होता, ज्याला शेकडो लोक उपस्थित होते. हे एक मोठे कुटुंब होते आणि विवाह सोहळ्यात 500 हून अधिक लोक सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील मिरज येथील नातेवाईकांनीही लग्नाला हजेरी लावली होती.

लग्न लागल्यानंतर , जेवणावर यथेच्छ ताव मारून , ज्यांना बाधा झाली त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. जेवल्यानंतर घरी आल्यावर उलट्या सुरू झाल्या. रात्री त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दहाहून अधिक जणांवर वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही बाब समजताच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावात धाव घेतली. ते घरोघरी जाऊन लोकांच्या आरोग्याची तपासणी करत आहेत.

Tags: