Belagavi

कुंपणाला लावलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने शेतकऱ्याचा मृत्यू

Share

खानापूर तालुक्यातील हारूर येथे शेताला लावलेल्या विद्युत तारेच्या कुंपणाला स्पर्श झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेतात लावलेल्या कुंपणाच्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने ही घटना घडली. विजेचा धक्का लागलेल्या व्यक्तीला त्याचा भाऊ वाचवण्यासाठी गेला आणि त्याला विजेचा धक्का लागल्याने दुसऱ्या बाजूला पडला आणि गंभीर जखमी झाला. पुढील उपचारासाठी बेळगावला पाठवले.

हारूर येथील शेतकरी व शिंदोळी गावचे उपाध्यक्ष यशवंत लकमण्णा शिवटणकर (72) यांचा पिकांना पाणी देताना विजेच्या तारेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी विद्युत तारांचे कुंपण घालण्यात आले आहे . गावातील ह्या शेतकऱ्याने आपल्या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी वीज जोडली होती.

यशवंत शिवटणकर सकाळी पिकाला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना विजेचा धक्का लागला. त्यावेळी त्यांचे भाऊ पांडुरंग शिवटणकर हे त्यांना वाचवण्यासाठी गेले असता त्यांनाही विजेचा धक्का बसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बेळगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी खानापुर पोलिस ठाण्यात प्रकरणाची नोंद करण्यात आली असून , चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: