Belagavi

राहुल गांधींमुळे ‘गृहलक्ष्मी’चे बेळगावऐवजी म्हैसूरमध्ये लोकार्पण

Share

राहुल गांधी यांचा वायनाडमध्ये कार्यक्रम असल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करून गृहलक्ष्मी योजनेचा लोकार्पण कार्यक्रम मैसूरमध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

बेळगावातील गृहलक्ष्मी योजनेच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या स्थळबदलाबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री जारकीहोळी म्हणाले की, राहुल गांधी दुसऱ्या नियोजित कार्यक्रमासाठी रवाना होणार असल्यामुळे हा कार्यक्रम बेळगावऐवजी म्हैसूरला करण्याचे ठरविण्यात आले आहे.

बॉम्बे टीम काँग्रेसमध्ये येणार, या प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांनी अजून किती लोक काँग्रेसमध्ये येतील याची माहिती नाही, पण भाजप-जेडीएस या दोन पक्षातून काहीजण येतील असे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी राज्यात 20 चे टार्गेट दिले आहे, भाषा आणि जातीच्या आधारे तिकीट दिले जाईल, उमेदवारांची यादी अंतिम नाही, प्रकाश हुक्केरी यांना चिक्कोडी मतदारसंघाचे तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्यासह काँग्रेस पक्षाचे नेते उपस्थित होते.

Tags: