चिक्कोडी तालुक्यातील येडूर गावातील वीरभद्रेश्वर-काडसिद्धेश्वर मठाच्या नूतन वारसदारांचा रेणुक देवरु यांचा प्रवेश कार्यक्रम संगीताच्या गजरात मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

या पूरप्रवेश मिरवणुकीत घोडा, सर्व वाद्ये, पुरवंत, सुवासिनींची कलश मिरवणूक अशा थाटात संपन्न झाला. घरोघरी रांगोळ्या काढून ह्या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले . ही मिरवणूक जुने येडूर , येडूर , बसवण्णा मंदिर, चेन्नम्मा सर्कल , वीरभद्रेश्वर मंदिरामार्गे शासकीय रुग्णालयाजवळ नेण्यात आली .
त्यानंतर नवीन वारसदार रेणुक देवरु , देव वीरभद्रेश्वर आणि देवी भद्रकालेश्वरी यांची विशेष पूजा करण्यात आली.
नंतर पूरप्रवेश मिरवणूक काडसिद्धेश्वर मठात आली, सायंकाळी आरती करून सुवासिनींनी त्यांचे स्वागत केले.नवीन उत्तराधिकारी रेणुक देवरु यांनी भगवान काडसिद्धेश्वरांना नमस्कार केला.त्यानंतर श्रीशैल जगद्गुरू 1008 डॉ. चन्नसिद्धरामांना , पंडितराध्य शिवाचार्यांचा आशीर्वाद घेतला .
यावेळी भगवान सुगुरेश्वर, अन्नदान शास्त्री व येडूरसह आजूबाजूच्या गावातील भाविक उपस्थित होते.


Recent Comments