खानापूर तालुक्यातील वड्डेबैल गावातील वैभव पाटील हा युवक बेपत्ता असून याप्रकरणी नंदगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

खानापूर तालुक्यातील वड्डेबैल गावातील 21 वर्षीय तरुण वैभव परशुराम पाटील हा गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता असून नुकतीच त्याच्या वडिलांनी नंदगड पोलीस ठाण्यात तो बेपत्ता फिर्याद दिली आहे.
वैभवविषयी कोणाला काही माहिती मिळाल्यास नजीकच्या पोलीस स्थानकाशी अथवा नंदगड पोलीस निरीक्षकांशी 9480804087 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .


Recent Comments