Agriculture

पावसाअभावी पेरणी केलेले बियाणे गेले वाया या.. शेतकऱ्यांची भीषण अवस्था

Share

यंदा मान्सूनच्या पावसाचे उशिरा आगमन झाल्याने तसेच योग्य पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगवून येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे

आमचे जिल्हा प्रतिनिधी राजू बागलकोटी यांनी दिलेला हा खास रिपोर्ट….

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कमी होत असून, या आठवड्यात पाऊस न झाल्यास पेरणी केलेले बियाणे सुकण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.
बेळगाव जिल्ह्यात 10 ऑगस्टपासून पावसाअभावी , जलाशयांची आवक कमी होऊन नदी नाले कोरडे पडले आहेत.

बेळगाव, खानापूर तालुक्यातील बागायती क्षेत्र जेथे भातपिकाची लागवड केली जाते हा चिंतेचा विषय आहे, संकेश्वर, हुक्केरी, निप्पाणी, चिक्कोडी, रायबाग , गोकाक बैलहोंगल , सवदट्टी तालुक्यात मका, तूर , मका , सुर्यफुल सोयाबीन, शेंगा, कापूस तसेच ऊस, भात यासारखी व्यापारी पिकेही पाण्याअभावी सुकून चालली आहेत. जमिनीत ओलावा नसल्यामुळे , हवामानातील बदलामुळे शेतकरी कीड आणि रोगांच्या भीतीने चिंतेत आहेत.

कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांनी जूनमध्ये थोडासा पाऊस पडल्याने मका आणि सूर्यफूल , सोयाबीनची पेरणी केली, मात्र ऑगस्टमध्ये झालेल्या पावसामुळे पेरणी केलेले भात सुकून नष्ट झाले.

ही समस्या केवळ बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचीच नाही तर ह्या राज्यातील शेतकऱ्यांचेही नुकसान होत आहे, शेतकऱ्यांना आत्महत्येपासून रोखण्यासाठी सरकारने थेट शेतकऱ्यांपर्यंत येण्याची गरज आहे.

बाबू नामक शेतकरी, शेतामध्ये काम नाल्यां हमाली करण्याची वेळ आली असल्याची नाराजी व्यक्त करीत आहे .
पिकांना योग्य फवारणी करून , उर्वरित पिकांचे संरक्षण करावे, शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार औषध फवारणी करावी, असा सल्ला कृषी विभागाचे सहाय्यक संचालक आर.बी.नायकर यांनी दिला आहे .

Tags: