राज्यसभा खासदार आणि प्रदेश भाजप रयत मोर्चाचे अध्यक्ष इराण्णा कडाडी यांनी आज राज्यसभा खासदाराच्या स्थानिक क्षेत्र विकास प्रकल्पांतर्गत बेळगाव येथील अंजनेय नगरातील केएमएफ डेअरजवळ बसस्टॉप बांधकाम कामाचे भूमिपूजन केले.
भूमिपूजनंतर बोलताना राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी सांगितले कि , या भागातील जनतेसाठी बस स्टॉप निर्माण करण्याची मागणी मा . आ . अनिल बेनके तसेच नगरसेवकांनी केली होती . त्यानुसार राज्य सभा सदस्यांच्या स्थानिक प्रदेश विकास निधीतून दहा लाखांचे अनुदान मंजूर करून आज या ठिकाणी या कामकाजाचे भूमिपूजन केले , या आधी माझ्या फंडातून , जिल्ह्यातील जनतेसाठी , बसस्टॉप , तरुणांसाठी जिम साहित्य , लायब्ररी ,समुदाय भवन , सांस्कृतिक भवनासहित अन्य कामांसाठी समर्पकपणे निधी वापरला आहे .
यावेळी मा . आ . अनिल बेनके म्हणाले कि इथली रहिवाशांच्या मागणीनुसार , खा . इराण्णा कडाडी याना बस स्टॉप बांधून देण्याची विनंती केली होती . त्यानी आपल्या अनुदानातून , दहा लाख रुपये मंजूर करून , आज नूतन बस स्टॉप बांधकामासाठी भूमिपूजन केले आहे . त्यासाठी मी या भागातील जनतेच्या वतीने त्याना धन्यवाद देतो . तसेच या भागात अनेक समस्या आहेत त्यांचे निराकरण करावे अशीविनंती देखील त्यांना करतो असे सांगितले .
माजी आमदार अनिल बेनके, नगर सेवक राजशेखर डोणी, वकील गिरीश पाटील,. रोहित हरिकांत , अजित पिल्ले, राजेंद्र उपाध्याय, बसू हणसी, तंगडगी यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.


Recent Comments