Belagavi

नामदेव दैवकी संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिन साजरा

Share

बेळगावच्या खडेबाजारमधील नामदेव दैवकी संस्थेच्या वतीने देशाचा ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला .

स्वातंत्र्यदिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष अजित कोकणे यांनी ध्वजारोहण केले .

यावेळी शुभांगी खटावकर तसेच निधीश उंडाळे यांची देशभक्तीपर भाषणे झाली .

नव्या माळवदे हिने भारतमातेच्या वेशभूषेत येऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले .

यावेळी सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या, समाजातील राजेश पतंगे यांचा सत्कार करण्यात आला .

त्यानंतर नामदेव देवकी मंदिरापासून , गणपत गल्ली , मारुती गल्ली , कॉलेजरोड , काकतीवेस आणि पुन्हा संस्थेच्या मंदिरापर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली .

या रॅलीत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

Tags: