खानापूर येथे 77 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

खानापुरा तालुका प्रशासनाच्या वतीने तहसील कार्यालयात 77 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
77 व्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यांच्याहस्ते महात्मा गांधी आणि वीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. नंतर तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी पोलीस विभागाकडून मानवंदना घेऊन ध्वजारोहण केले.
यावेळी बोलताना तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस सी पाटील यांच्या हस्ते पोलीस ठाण्यासमोर ध्वजारोहण करण्यात आले. तालुका सार्वजनिक रुग्णालयात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी तालुक्यातील मान्यवर व विविध विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments