हुक्केरी शहरात ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
सकाळी शहरातील पोलीस ठाण्यात , निरीक्षक महांतेश बसापुरे यांनी ध्वजारोहण करून कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तहसीलदार नाईक यांच्या हस्ते तालुका प्रशासन भवन येथे ध्वजारोहण करण्यात आले.

त्यानंतर आमदार निखिल काठी यांनी थेट जुन्या बसस्थानकाच्या वीरस्तंभावर ध्वजारोहण केले, मुख्याधिकारी किशोर बेन्नी यांनी पालिका इमारतीवर ध्वजारोहण केले व पोलीस पथकाकडून ध्वजारोहण करण्यात आले.
राजू बागलकोटी यांनी नूतन बसस्थानकावर ध्वजारोहण केले.
त्यानंतर एस.के.हायस्कूलच्या मैदानावर जाहीर कार्यक्रमात अवुजीकरआश्रमाचे अभिनव मंजुनाथ महाराज यांच्या दिव्य उपस्थितीत व आमदारांच्या उपस्थितीत तालुका दंडाधिकारी मंजुळा नाईक यांनी पोलीस, होमगार्ड, स्काऊट गाईड व विविध शाळांच्या परेडकडून मानवंदना स्वीकारली . . विद्यार्थ्यांनी तिरंग्याला वंदन करून देशासाठी बलिदान दिलेल्यांचे आदर्श आणि देशभक्ती याविषयी सांगितले.आपण सर्वांनी संघटित होऊन देशाला बळकट बनवायचे आहे, असे त्या म्हणाल्या .
व्यासपीठावर बीईओ प्रभावती पाटील, जिल्हा पंचायत अभियान अधिकारी एस.के.पाटील, कृषी अधिकारी आर.बी.नाईकर, मान्यवर अशोक पट्टणशेट्टी, पिंटू शेट्टी, राजू मुन्नोल्ली, उदय हुक्केरी, आलम शाह मकानदार , राजू मुजावर, कबीर मल्लिक, नगरसेवक उपस्थित होते.
नंतर विविध शालेय विद्यार्थ्यांनी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले.
तसेच गजबरवाडी शासकीय प्राथमिक शाळा व शासकीय उर्दू व कन्नड शाळेत एसडीएमसीचे अध्यक्ष शाबुद्दीन मुजावर व रियाज मुल्ला यांनी ध्वजारोहण करून शालेय मुलांकडून मानवंदना स्वीकारली .


Recent Comments