76 व्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचा एक भाग म्हणून कर्नाटक कोस्टल कल्चरल असोसिएशन, हॉटेल ओनर्स असोसिएशन आणि कर्नाटक कोस्टल अर्बन को-अप सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने 19 व्या वार्षिक खुल्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, असे हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष उमेशराव बंतोडकर यांनी सांगितले.

अथणी शहरातील हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ. भोजराज स्टेडियमवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले कि , या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री व आमदार लक्ष्मण सवदी यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता आर.एच.कुलकर्णी सभागृहात होणार असून अध्यक्षस्थानी जाधवजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.रमा कुलकर्णी असतील.
प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार बी.एस.कडकभावी , अथणी डीवायएसपी श्रीपाद जल्दे, सीपीआय रवींद्र नायकोडी, क्षेत्र शिक्षणाधिकारी एम.बी.मोरतगी, तालुका पंचायत अधिकारी वीरण्णा वाली आदी उपस्थित राहणार आहेत. नागरिक व रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे ते म्हणाले.
बी एम मालगीकार, गुरुराज भट्ट, राजेंद्र मुरुगेश बानी, सी बी मालगीकार , सहकारी संस्थेचे व्यवस्थापक, नॅशनल जनरल इन्शुरन्सचे सल्लागार संजीव टेंगिनकायी आदी या वेळी उपस्थित होते.


Recent Comments