Khanapur

खानापुरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय

Share

खानापूर शहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची बैठक श्री लक्ष्मी मंदिर येथे पार पडली. या बैठकीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या सभेच्या अध्यक्षस्थानी शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष पंडित ओगले होते.त्यांनी आपल्या शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती दिली.खबरदारीचा उपाय म्हणून नगर पंचायतीने शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. तसेच हेस्कॉम विभागालाही गणेश विसर्जनाच्या वेळी विद्युत व्यवस्थेची माहिती दिली आहे. क्रेन यंत्रणेबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने भेट घेऊन तसेच जिल्हा पालकमंत्री डॉ. सतीश जारकीहोळी निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉल्बीच्या दणदणाटामुळे जनतेला त्रास होणार नाही यासाठी सर्वाना जनजागृती करून हा गणेशोत्सव शिस्तबद्धपणे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी सार्वजनिक गणेशोत्सवाचे कार्याध्यक्ष रवी काडगी , प्रकाश देशपांडे, संजय कुबल यांनी मनोगत व्यक्त केले.अप्प्या कोडोली, गजानना कुंभार , दीपक चौगले, किरण हडकर, नारायण ओगले, आकाश अथणीकर व सार्वजनिक गणेशोत्सवाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: