Belagavi

गव्याची शिकार करणाऱ्या दोघा शिकाऱ्याना ताक

Share

अवरोळी गावाच्या हद्दीत गव्याची शिकार करणाऱ्या दोन आरोपींना गोलीहळ्ळी वन अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

खानापूर तालुक्यातील गोलीहळ्ळी जंगलाच्या हद्दीत गव्याची शिकार करणाऱ्या अवरोळी गावातील सोमनिंग रवळप्पा कोडोली आणि प्रभू नडाप्पा कोडोली यांना बेळगाव विभागाचे उप वनसंरक्षक कल्लोळ आणि उपविभागीय वनसंरक्षक मल्लिनाथ कुसनाल यांनी अटक केली. गोलीहळ्ळीच्या वनाधिकारी वनश्री हेगडे यांनी आरोपीना न्यायालयासमोर हजर केले .

यावेळी उप वनाधिकारी संजय मगदुम्म, अशोक हुली, कुमारस्वामी हिरेमठ यांच्यासह गस्ती वनपाल अजय भास्करी, गिरीश मेक्केद वीरप्पा करलिंगनवर, बी.ए. माडिक आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

Tags: