बेळगाव तालुक्यातील कडोली ग्राम पंचायत कार्यालयामध्ये नवनिर्वाचित ग्रापं अध्यक्ष सागर पाटील व उपाध्यक्षा दीपा मरगाळे यांचा पदग्रहण व ग्राम पंचायत सदस्यातर्फे सत्कार कार्यक्रम पार पडला.
नुकत्याच झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ग्रापं अध्यक्षपदी सागर पाटील व उपाध्यक्षपदी दीपा मरगाळे यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा सदस्यांतर्फे सत्कार करण्यात आला.
नंतर नुतन ग्रा.पं.अध्यक्ष सागर पाटील व उपाध्यक्ष दीपा मरगाळे यांनी मंत्री सतीश जारकिहोळी आणि माजी जि.पं.सदस्य उदय सिद्धण्णवर यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली सर्व ग्राम पंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन, ज्येष्ठ व वडिलधारी ग्रामस्थांच्या मार्गदर्शनानुसार कडोली ग्रा.पं क्षेत्रामध्ये येणाऱ्या कडोली, जाफरवाडी, गुंजेनट्टी व देवगिरी या चारही गावातील रस्ता, गटार, पाणी व शेतकरी, महिला, रोजगारासह सर्व समस्या सोडवून वास्तव परिस्थीती पाहूनच सर्व वर्गातील गरिब व गरजुनां सर्व सरकारी योजना मिळवून देत विविध योजना राबवुन कडोली ग्राम पंचायत एक आदर्श ग्राम पंचायत बनवून सर्वांच्या विश्वाला पात्र ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रापं सदस्य सिद्धु शहापुरकर, नागेश बांदिवडेकर, लक्ष्मण गौंडाडकर, माजी ग्रापं अध्यक्षा श्रीदेवी पाटील, प्रतिभा पाटील, सुरेखा पवार, प्रभावती पाटील, संजना जाधव, भारती चव्हाण, वैशाली बिजगत्तीचे, संगिता चिंचनगी, मंजुळा अंकी, दिपक मरगाळे, भाऊ पाटील, रंजित पाटील, गणेश चव्हाण, रायाप्पा गावडे, प्रताप पाटील, अमोल पाटील, सुरेश गुडीमनी, यल्लाप्पा मेत्री, रामचंद्र हित्तलमनी, संभाजी रुटकुटे, कल्लाप्पा बिजगत्तीचे, इब्राहिम ताशीलदार, चिदंबर पट्टणशेट्टीसह असंख्य समर्थक,अभिमानी कार्यकर्ते ,ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
तर ग्रा.पं.अकांटंट प्रभाकर कंग्राळकर यांनी प्रास्ताविक तर क्लर्क महादेव पाटील यांनी स्वागत करून आभार मानले.


Recent Comments