Banglore

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून रणनीती मुख्यमंत्री सिद्दरामय्यांनी घेतली बेळगाव जिल्ह्यातील मंत्री-आमदारांची बैठक

Share

मोठ्या झटापटीनंतर गॅरंटीच्या बळावर राज्यात सत्तेत आलेल्या काँग्रेसकडून आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती राबविण्यास प्रारंभ झाला आहे. यासाठी जिल्हानिहाय मंत्री-आमदारांची बैठकांचे सत्र सुरु केले आहे. त्यानुसार आज मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी आज बेळगाव जिल्ह्यातील मंत्री-आमदारांची बैठक घेऊन लोकसभेच्या जास्तीतजास्त जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या.

पाच गॅरंटीच्या बळावर राज्यात सत्तेत आलेल्या काँग्रेसने आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुनियोजित रणनीती राबविण्यास प्रारंभ झाला आहे. पक्षाचे आमदार आणि मंत्र्यांमधील मतभेद दूर केल्यानंतर आता लोकसभा निवडणुकीवर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार त्या-त्या जिल्ह्यांतील पक्षाच्या आमदार व मंत्र्याची बैठक घेऊन त्यांना कार्यप्रवृत्त केले जात आहे.

या रणनीतीनुसार मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी आज विजयपूर आणि बेळगाव जिल्ह्यातील मंत्री आणि आमदारांशी गृह कार्यालय कृष्णा येथे चर्चा केली. सकाळी विजयपूर जिल्ह्यातील मंत्री-आमदारांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी दुपारी बेळगाव जिल्ह्यातील मंत्री-आमदारांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी संबंधित मंत्री-आमदारांच्या मतदारसंघाचा विकास, अनुदान आणि लोकसभा निवडणुकीची तयारी यावर चर्चा केली. राज्यात सत्तेत आल्यावर लोकसभेच्या जास्तीतजास्त जागा जिंकणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. बूथ लेव्हल कार्यकर्त्यांपासून सर्वांना विश्वासात घेऊन अधिकाधिक जागा मताधिक्क्याने यतेची याकडे लक्ष देण्याची सूचना मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी केली


यावेळी उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार, महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, जिल्ह्याचे आमदार उपस्थित होते.

Tags: