Belagavi

‘काडुव कविते’ कन्नड काव्यसंग्रहाचे बेळगावात प्रकाशन

Share

बी. ए. सनदी सांस्कृतिक प्रतिष्ठान बेळगाव आणि सह्रदय साहित्य प्रतिष्ठान सौंदत्ती यांच्या संयुक्त विद्यमाने नागेश नायक यांच्या ‘काडुव कविते’ कन्नड काव्यसंग्रहाचे प्रकाशन कन्नड साहित्य भवन, बेळगाव येथे करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना बी ए सनदी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ए ए सनदी म्हणाले की, आजच्या जगात मोबाईलच्या व्यसनाधीन असलेल्या माणसांना लेख, स्तंभ व इतर पुस्तकांचे वाचन करून साहित्य विश्वाची जाणीव करून देणारे नागेश नायक यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

काडुव कविते हे पुस्तक जितके व्यापक आहे तितकेच त्याचा अर्थही व्यापक आहे. पुस्तकातील लेखन अर्थपूर्ण आहे. ताक घुसळले की लोणी बाहेर येते, लोणी गरम केले की कणिकदार तूप बाहेर येते, त्या तुपासारखे अनुभवांची घुसळण करून हे पुस्तक लिहिले आहे असे त्यांनी सांगितले.

 

बेळगावच्या प्रसिद्ध कवयित्री डॉ. निर्मला बट्टल यांनी पुस्तकाचे प्रकाशन करून बोलताना सांगितले की, प्रत्येकाला वाचनाची सवय लावली पाहिजे. मोबाईल युगात आपण हरवून गेलो आहोत आणि वाचनाची गोडी विसरलो आहोत. या कवींची पुस्तके आपल्यासाठी आदर्श आहेत. व्हॉट्स ऍपमध्ये मग्न असलेले आपण सर्व प्रथम फादर्स डे साजरा करतो आणि सर्व दिवस आपल्या मोबाईलवर साजरे करतो. आपण आपल्या बाप-आजोबांबद्दल कविता लिहित असतो. मोबाईल युग नसताना आपण कवितेतून भावना व्यक्त करत होतो याची आठवण त्यांनी करून दिली. बेसागर हळ्ळी रामण्णा यांनी पहिली कविता लिहिली, अशा कवींचा आदर्श आपण घेतला पाहिजे असे त्यांनी सांगितले.


यावेळी बेळगावचे प्रसिद्ध लेखक शिरीष जोशी यांच्या हस्ते एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रथमश्रेणी सरकारी कंत्राटदार बसवराज गौडप्पा बिलशिवण्णावर व बेळगावचे कार्यकारी अभियंता विठ्ठल तडसलूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी सनदी सांस्कृतिक प्रतिष्ठान बेळगाव व सहृदय साहित्य प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Tags: