माजी गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी एआयसीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर वर्णवाचक टीका केल्याबद्दल खर्गे यांची माफी मागावी, अशी मागणी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस एससी कमिटीने काँग्रेस भवनात झालेल्या निषेध कार्यक्रमात केली.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रंगाबद्दल अवमानकारक बोलून माजी गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी त्यांची मनुस्मृतीयुक्त मानसिकता दाखवून दिली आहे. त्यांच्या बोलण्याने समस्त दलित समाजाचा मोठा अपमान झाला आहे, आपल्या शब्दाबद्दल ज्ञानेंद्र यांनी ताबडतोब जाहीर माफी मागावी असे चिक्कोडी जिल्हा काँग्रेस एससी कमिटीने म्हटले आहे. संताप व्यक्त करत अरग ज्ञानेंद्र यांनी बोलताना आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवावे, असे सांगितले. बाइट.
तीर्थहळ्ळी येथे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबद्दल अरग ज्ञानेंद्र यांनी अवमानकारक बोलून आमचं मन दुखावले आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे शोषित वर्गातून येऊन, पक्षनिष्ठेवर मोठे झालेले नेते आहेत. ते आज गुलबर्गा ते दिल्ली स्तरापर्यंत मोठे झालेले नेते आहेत. त्यांची ज्ञानेंद्र यांनी तातडीने माफी मागावी अशी मागणी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस एससी विभाग अध्यक्ष नामदेव कांबळे यांनी केली.
यावेळी रायबाग ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष श्रावणकुमार कांबळे, जिल्हा काँग्रेस एससी उपाध्यक्ष दिलीप पायन्नवर, जिल्हा कमिटी सदस्य काडेश ऐहोळे, युवा नेते अण्णाप्पा असोदे, मैलिंदा चिंचाळीकर, विठ्ठल तळवार, प्रेम कांबळे, चेतन कांबळे, लक्ष्मण कांबळे, विनायक कांबळे, मंजुनाथ कांबळे, सोशल नेटवर्क्सचे उपाध्यक्ष प्रशांत कांबळे यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते.
Belagavi
चिक्कोडी जिल्हा काँग्रेस एससी विभागाकडून अरग ज्ञानेंद्र यांचा निषेध


Recent Comments