हुक्केरी तालुक्यातील शिरुर गावातील मार्कंडेय जलाशयातून पाचशे क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
बेळगावच्या सीमेला लागून असलेल्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसामुळे मार्कंडेय नदीतून 1300 क्युसेक पाण्याची आवक होत असून, शिरुर जलाशय भरण्याच्या पार्श्वभूमीवर घटप्रभा उजवा कालवा उपविभागाच्या पाटबंधारे अधिका-यांनी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
यमकनमर्डी उपतहसीलदार चन्नम्मा शिगीहोळी यांनी गंगा पूजन करून पाणी सोडण्यासाठी गेट उघडले.
यावेळी बसदापूर ग्रामपंचायत अध्यक्ष भीमशी काखमणी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता नागराज, कार्यकारी अभियंता रवी तलूर, सहायक अभियंता एस.के.एंटेतिनांवर उपस्थित होते.
जलाशयातून सुमारे 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने बसापूर, पाश्चापूर, गोडचिनमलकी गोकाक शहरातील नदीकाठच्या लोकांनी सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा पाटबंधारे अधिकाऱ्यांनी दिला आहे.
Recent Comments