उचगाव ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक पंचायत कार्यालयामध्ये पार पडली. यावेळी अध्यक्षपदी मथुरा बाळकृष्ण तेरेसे तर उपाध्यक्षपदी बाळकृष्ण खाचो तेरशे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संपूर्ण बेळगाव तालुक्याचे लक्ष वेधून राहिलेल्या उचगाव ग्रामपंचायतची निवडणूक आज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बिनविरोध पार पडली उचगाव बसुरते आणि कोनेवाडी या तीन गावच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या एकूण 21 सदस्य संख्या असलेल्या सर्वात मोठ्या उचगाव ग्रामपंचायतीची निवडणूक आज बिनविरोध पार पडली. आणि पंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची माळ पती-पत्नीला मिळाल्याने आज तालुक्यामध्ये सर्वत्र चर्चेचा विषय झालेला आहे. या पंचायत मध्ये एकूण 21 सदस्य संख्या असून आज निवडणुकीसाठी 13 सदस्य उपस्थित होते आणि आठ सदस्य गैरहजर होते त्यामुळे आज निवडणूक न घेता बिनविरोध निवडणूक करण्यात आली.
यावेळी अध्यक्षपदासाठी म्हणून सामान्य महिला आणि उपाध्यक्ष पदासाठी सामान्य असे आरक्षण जाहीर झाले होते यावेळी अध्यक्ष पदासाठी म्हणून मथुरा तेरशे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर उपाध्यक्ष पदासाठी बाळकृष्ण तेरेसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि दुसरा उमेदवारी अर्ज नसल्यामुळे आज दोघांनाही बिनविरोध म्हणून घोषित करण्यात आले यावेळी 13 सदस्य उपस्थित होते त्यामुळे सदर निवडणूक बिनविरोध झाली. बऱ्याच दिवसापासून या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधून राहिले होते त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असे वाटले होते दोन गटांमध्ये ही निवडणूक चुरशीची होणार होती मात्र आज निवडणुकी दिवशी आठ सदस्य गैरहजर राहिल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून इरिगेशन डिपार्टमेंटचे असिस्टंट इंजिनिअर संजय कुमार माळगी हे होते.
नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा ग्रामपंचायत च्या वतीने पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले त्यानंतर समर्थकानी गुलाल आणि फटाक्याची आतिषबाजी करून अध्यक्षांनी उपाध्यक्षांचा जयघोष केला त्यानंतर मिरवणूक काढण्यात आली.
पती-पत्नी अध्यक्ष उपाध्यक्ष होण्याची एकमेव पंचायत
बेळगाव जिल्हात ग्रामपंचायतच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदी पती-पत्नी होण्या होण्याचा मान उचगाव ग्रामपंचायतला मिळाला असून हा बेळगाव जिल्हात मिळाला असल्याचे तेरसे यांनी सांगितले कारण एकाच गाम पंचायत मध्ये पंचायतीमध्ये पती-पत्नी सदस्य असून अध्यक्ष उपाध्यक्ष होण्याचा मान मधुरा तेरसे आणि बाळकृष्ण तेरेसे यांना मिळाला आहे. त्यामुळे तालुक्यांमध्ये त्यांचे सर्वत्र चर्चा होऊन अभिनंदन होत आहे.


Recent Comments