हुक्केरी तालुक्यात मोहरमचा सण शांततेत साजरा करण्यात आला. गेल्या नऊ दिवसांपासून यमकनमर्डी, संकेश्वर, पाश्चापूर, हुक्केरी या शहरांसह हुक्केरी तालुक्यातील विविध गावांमध्ये पंजांची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि शुक्रवारी रात्री विविध शहरांतून आलेल्या पंजांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेऊन मोहरम साजरा करण्यात आला .


शनिवारी रात्री, हिंदू मुस्लिम जनता शहरांमध्ये जमली आणि देवतांना बळी अर्पण केले.
हसीना हुसेन, लालसाब मुल्ला , , नदाफ दादल शाह आदींनी शनिवारी सकाळी बीबी फातिमा चे दर्शन घेऊन आपापल्या ठिकाणी परतले .
त्यानंतर दुपारी गजबरवाडी व हुक्केरी नगरातील ताबूत आणि पंजांची मिरवणूक काढण्यात आली.

मिरवणुकीत तरुणांनी डॉल्बीच्या तालावर नृत्य केले , काही तरुणांनी त्यांच्या अंगावर लाठ्या-काठ्या मारल्या . सरतेशेवटी पंजांचे विसर्जन करण्यात आले .
यावेळी हुक्केरी तालुक्यातील अकरा जमात सदस्यांसह मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधवांनी मोहरम सणात सहभागी होऊन हा सण शांततेत साजरा केला.


Recent Comments