Belagavi

दिव्यांगला पोलिसांनी केलेली मारहाण प्रकरण , मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मागवला अहवाल

Share

महिला व बालकल्याण विभाग, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक सक्षमीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव येथील पोलिसांच्या क्रूरतेची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

यासंदर्भात मंत्र्यांनी पोलिस आयुक्तांना पत्र लिहिले आहे. मतिमंद व्यक्तीला पोलिसांनी रात्री रस्त्याच्या मधोमध लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि रात्रभर तेथेच त्रास दिला, अशी बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आली आहे. या संदर्भात चौकशी करून दोषी पोलिसांवर काय कारवाई करण्यात आली याची माहिती देण्याच्या सूचना मंत्र्यांनी दिल्या आहेत.

Tags: