corporation

पावसाच्या समस्येवर महापौर, आयुक्तांनी खबरदारी घेतली नाही : सुवर्णा कल्लाकुंतला यांचा आरोप

Share

हुबळी-धारवाड जुळ्या शहरांमध्ये संततधार पाऊस सुरू असून अनेक समस्या निर्माण होत आहेत. या संदर्भात महापौर वीणा बरदवाड व नूतन महानगरपालिका आयुक्त डॉ. ईश्वरा उल्लागड्डी यांनी कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचा आरोप महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या सुवर्णा कल्लाकुंतला यांनी केला.
हुबळीत पत्रकार परिषदेत बोलताना विरोधी पक्षनेत्या सुवर्णा कल्लाकुंतला म्हणाल्या की, पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले असून, या संदर्भात महापालिकेने प्रत्येक प्रभागाच्या विकासासाठी तातडीने 50 लाखांचा निधी जाहीर करावा. याशिवाय अन्य विभागातून महापालिकेत येणाऱ्या अधिकाऱ्यांची येथून तत्काळ बदली करण्यात यावी. मुख्यमंत्री व महापालिका प्रशासन मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
हुबळी-धारवाड महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेता या नात्याने सत्ताधारी पक्षाचे अपयश अधोरेखित करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. वीणा बरदवाड या महापौर झाल्यानंतर जनतेच्या सुखदुःखात सहभागी झाल्या नसल्याची भावना निर्माण झाली आहे. सध्याच्या पावसामुळे लोकांचे मोठे हाल होत आहेत. या प्रकरणी महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने उत्तर द्यायला हवे होते, ते गाफील राहिले आहे. यापूर्वीच्या महापौर इरेश अंचटगेरी यांनी संपूर्ण वर्ष अभिनंदन आणि सत्कार स्वीकारण्यात घालवले आहे. नगरसेवकांना निकृष्ट दर्जाचा नाश्ता उपलब्ध करून देऊनही ते ठेकेदारांवर कारवाई करण्यास मागेपुढे पाहत असल्याची टीका त्यांनी केली.
नगरसेवकांना दिला जाणारा नाश्ता बंद करून त्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत, असा प्रस्ताव आमदार प्रसाद आबय्या यांनी विधानसौधमध्ये मांडला आहे. मी याचे स्वागत करते. जिल्ह्याचे पालकमंत्री संतोष लाड व मनपा आयुक्तांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी केली. बाईट.

Tags: