राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या गृहलक्ष्मी योजनेचे अर्ज भरण्यासाठी बेळगावमध्ये बेळगाव वन केंद्रावर महिलांची मोठी गर्दी उसळली आहे . मात्र सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण झाल्याने आलेल्या महिलांना मोठी समस्या निर्माण झाली आहे .

व्हॉइस ओव्हर : राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी , गृहलक्ष्मी योजना लागू केली आहे . मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते या योजनेचे लोकार्पण काण्यात आले . या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी उत्सुक आहेत . योजना जारी होताच अनेक महिलांनी आपापली कागदपत्रे घेऊन बेळगावच्या बेळगाव वन केंद्रात धाव घेतली आहे . मात्र पर्सेस माहितीच्या अभावी तसेच सर्वर डाऊनची समस्या उद्भवल्याने , त्यांना गृहलक्ष्मी योजनेचे अर्ज भरता आले नाही .
यासंबंधी परवीन नामक महिलेने सांगितले कि राज्य सरकरने अतिशय चांगल्या योजना अमलात आणल्या आहेत . गृह श्लेष्म योजनेचे अर्ज भरण्यासाठी इथे आले होते . मात्र सर्व्हर डाऊन आहे . इथल्या कर्मचाऱ्यांनी माहिती दिली आहे . सरकारने जरी केलेल्या फोन क्रमांकावर डायल केल्यानंतर , आलेल्या मेसेजनुसार , दिलेल्या वेळेप्रमाणे जाऊन अर्ज भरायचा आहे .
यासंबंधी कर्नाटक वन कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांनी सांगितले कि , लाभार्थ्यांच्या मोबाईल नंबरला मेसेज आल्यानंतर , त्यांनी ईथे येऊन अर्ज भरायचा आहे . ग्राम वन, बापूजी सेवा केंद्र , कर्नाटक वन , आदी ठिकाणी ही सुविधा देण्यात आली आहे .
एकंदर सरकारच्या गृहलक्ष्मी योजनेचा , पहिल्याच दिवशी अर्ज भरण्यासाठी आलेल्या व्यक्तींना सर्व्हर डाऊन समस्यांमुळे , निराश व्हावे लागले .


Recent Comments