विजापूर येथील राम मंदिराजवळ मंगळवारी महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी बेकायदेशीरपणे साठवलेल्या प्लास्टिकच्या दुकानावर छापा टाकल्याची घटना घडली.
विजापूर महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी अचानक व्ही. रुणवाल पॅकेजिंग दुकानावर अचानक छापा टाकून लाखोंचे अवैध प्लास्टिक जप्त केले. महापालिकेचे आयुक्त सौदागर यांच्या आदेशावरून हा छापा टाकण्यात आला. यावेळी प्लास्टिकचे कप, प्लास्टिक पेपरसह विविध साहित्य जप्त करण्यात आले. या छाप्यामध्ये महानगर पालिकेचे आरोग्य निरीक्षक व्यंकटरमलू, प्रवीणा कंबळी, संजू अथणी, शिल्पा गडगी, अशोक सेडमकर यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.



Recent Comments