पावसाने ओढ दिल्याने कर्नाटकात विशेषतः उत्तर कर्नाटक, कल्याण कर्नाटक भागात शेतकरी संकटात सापडले आहेत. यंदा शेती उत्पादनाला फटका बसून राज्याच्या अर्थचक्रावर परिणाम होणार असल्याने किमान कृषी क्षेत्रासाठी तरी दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय गांभीर्याने घ्या अशी मागणी माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सरकारकडे केली.
VOICE : विधिमंडळ अधिवेशनात आज विधानसभेत बोलताना बोम्मई यांनी सांगितले की, एकदा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी पाऊस होत असल्याचे पाहून दुबार पेरणी केली आहे. मात्र मोसमी पाऊस लांबल्याने राज्याचे अर्थचक्र बिघडणार आहे. सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे होणार आहे. आतापर्यंत सात लाख हेक्टर्स क्षेत्रात पेरण्या व्हायला पाहिजे होत्या. पण त्या केवळ 1.14 लाख हेक्टर्स क्षेत्रात झाल्या आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्रापुरती तरी दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पुढेही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने आधीच्या व आताच्या आत्महत्येच्या आकडेवारीची तुलना करत न बसता ही बाब गांभीर्याने उपाययोजना करावी. पाणीटंचाई निवारणासाठी प्रत्येक जिल्हा पंचायतीला एक कोटी देण्याऐवजी प्रत्येक मतदारसंघाला द्यावेत अशी मागणी बोम्मई यांनी केली. बाईट. त्यांच्या मागणीला अरग ज्ञानेंद्र यांनीही पाठिंबा दिला. फ्लो


Recent Comments