चालकाचे नियंत्रण सुटल्याने , ते उसाच्या शेतात पलटी झाल्याची घटना , बैलहोंगल तालुक्यातील हारुगोप्प मरकुंबी गावात घडली आहे . सुदैवाने , या वाहनातील शाळकरी मुले बचावली आहेत .

हे शालेय वाहन गणाचारी शैक्षणिक संस्थेच्या एक्सलंट एज्युकेशन सोसायटीचे असल्याची माहिती आहे. गाडीत 37 विद्यार्थी होते. या अपघाताचे कारण लहान वाहनात बरीच मुले बसल्याचे सांगण्यात येत आहे.
लहान वाहनात क्षमतेपेक्षा जास्त मुलांना बसवल्याचा आरोप होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाल्याने स्थानिकांनी धाव घेत मुलांना वाचवले. 37 मुले किरकोळ जखमी होऊन बचावली. वाहन बदलण्यासाठी कितीही सांगितले तरी ते ऐकत नसल्याची तक्रार पालकांनी केली


Recent Comments